Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मध्यप्रदेश , महाराष्ट्राच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर दिल्ली सरकारचा आक्षेप

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र यांना त्यांच्या मागणीपेक्षा अधिक ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे, हे दिल्ली सरकारने आज दिल्ली उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे.

 

दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, दिल्लीला आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवला जात नाही.

 

आता दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला हे आरोप सत्य आहेत की नाही याबद्दलचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली सरकारने सर्व राज्यांना पुरवण्यात येणाऱ्या ऑक्सिजनबद्दलची सर्व माहिती सादर केली. सर्व राज्यांना त्यांच्या मागणीनुसार पुरवठा करण्यात आला आहे. फक्त दिल्लीची मागणी पूर्ण करण्यात आलेली नसल्याचं राज्य सरकारने सांगितलं. त्यावर  हा वाद आता राजकीय होत चालला आहे असं उत्तर केंद्राकडून देण्यात आलं.

 

 

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला त्यांच्या मागणीपेक्षा जास्त पुरवठा का करण्यात आला आणि दिल्लीला मागणीपेक्षा कमी ऑक्सिजन का देण्यात आला असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने केला आहे. न्यायालयाने केंद्राला या आरोपांबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे.

 

दिल्ली सरकारचं असंही म्हणणं आहे की, लोकांना खरंतर संपूर्ण माहिती मिळणं गरजेचं आहे.पण आत्ता पुरेशी माहिती मिळत नाही.  तुम्ही रेमडेसिवीर सर्वांना उपलब्ध करुन द्यायचं ठरवलं तर मागणी एवढी आहे की आपल्याला गरजेनुसार पुरवठाही करणं शक्य नाही.

Exit mobile version