Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मधूमेहग्रस्तांसाठी डिजीटल तंत्रज्ञानाच्या साह्याने मार्गदर्शन 

शेंदूर्णी, ता.जामनेर । येथील साने मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. कल्पक साने यांनी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून मधुमेह आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.

.कोरोना संक्रमणाचा काळ मधुमेहग्रस्तांसाठी  कठीण असाच आहे. मात्र पुरेशी काळजी घेतली तर मधुमेह रुग्ण या संकटाशी यशस्वीरित्या संघर्ष करू शकतात, असा आशावाद निर्माण करून डॉ .कल्पक साने यांनी राज्यभरातील शेकडो  मधूमेह रुग्णांच्या जिवन जगण्याच्या आशा पल्लवीत केल्या. घरी बसून आरोग्य विषयक मार्गदर्शन मिळाल्याने रूणांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्रामीण भागातही तंत्रज्ञानाचा वापर करून विविध समस्यावर मात करता येते हे रुग्णांनी अनुभवले. अशा प्रकारचे विविध रोगावर मार्गदर्शन शिबिर व्हावेत ही आता काळाची गरज बनली आहे. डिजीटल तंत्रज्ञाना तील ” झुम ” या अॅपच्या साह्याने  “डायबीटीस आणि कोरोना काळात मधूमेह ” यात रुग्णांनी घ्यावयाची काळजी “या विषयावर डॉ. कल्पक साने यांनी प्रत्यक्ष रूग्णांशी संवाद साधला . रूग्णाच्या विवीध समस्यावर मार्गदर्शन व उपाययोजना सुचवली.

Exit mobile version