Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मधुकर साखर कारखान्याचे संचालक बारसु नेहते यांचे अल्पशा आजाराने निधन

 

यावल , प्रतिनिधी  । मधुकर साखर कारखान्याचे संचालक बारसु रामदास नेहते (वय ८२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर कोरपावली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोरपावली येथील माजी सरपंच , दूध डेअरीचे व डी.  एच. जैन विद्यालयाचे माजी चेअरमन तथा मधुकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी संचालक तसेच तालुक्यातील विविध संस्थावर आपल्या निस्वार्थ सेवाभावी कामाचा ठसा उमटवणारे माजी गृहराज्यमंत्री स्व .जे .टी . महाजन यांचे अत्यंत विश्वासु व  काँग्रेसचे जेष्ठ नेते बारसु नेहेते यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांवर कोरपावली ता, यावल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , दोन मुली , सुन, नांतवंडे असा परिवार आहे .

 

Exit mobile version