Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मद्यधुंद ट्रक चालकाने दिली बससह पाच दुचाकींना धडक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीपेठ परिसरातील विद्या निकेतन महाविद्यालयाजवळ मद्यधुंद ट्रक चालकाकडून पुढे चालणाऱ्या बससह पाच दुचाकींना धडक दिल्याची घटना सोमवारी १६ जानेवारी रोजी दुपारी घडली आहे. यावेळी नागरीकांनी ट्रकचालकाला चांगलाच चोप देवून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव शहरातील नवीपेठ भागातील गोलाणी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक दरम्यान असलेल्या विद्या निकेतन महाविद्यालयाजवळून ट्रक क्रमांक (एचएच ३४ एव्ही १४५३) जात होता. या ट्रकवरील चालक यांने दारू पिलेली होती. यावेळी त्याने दारूच्या नशेत असतांना बस आणि इतर पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात काहीजण किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान, अश्या परिस्थितीत अपघातावरीन नियंत्रण सुटले असते तर मोठी दुर्घटना घडली असती असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. यावेळी काही सुज्ञ नागरीक व तरूणांच्या सहकार्याने ट्रक विद्या निकेतन महाविद्यालयाजवळ थांबवून दारूच्या नशेत असलेल्या चालकाचा खाली उतरविले. अपघातातील जखमी झालेल्या संतप्त वाहनधारकांनी ट्रकचालकाला चांगलाच चोप दिला व पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या वेळी वाहतूकीची मोठी कोंडी होवून वाहतूक विस्कळीत झाली होती.

Exit mobile version