Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मतदारांसाठीची २ क्विंटल जिलेबी , १ हजार समोसे पोलिसांकडून जप्त !

 

 

लखनौ : वृत्तसंस्था ।  उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदारांसाठी तयार करण्यात आलेली  २ क्विंटल जिलेबी , १ हजार  समोसे पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत ! पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दहा जणांना अटकही केलं आहे.

 

देशभरात सध्या कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. उत्तर प्रदेशातही कोरोना वाढत असल्याचं समोर आलेल्या आकडेवारीत  दिसत आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही या राज्यात होत आहे. जिलेबी आणि सामोसे जप्त करण्याला या दोन्ही गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.

 

हसनगंज ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवारांने मतदारांना वाटप करण्यासाठी जिलेबी आणि सामोसे यांचा बेत आखला होता. तशी तयारीही करण्यात आली. आचारी आले, कामाला लागले. जिलेबी आणि सामोसे तयार करण्याचं काम सुरू असतानाच उन्नाव पोलिसांनी घटनास्थळी पाऊल ठेवलं.

 

 

सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी मतदारांना वाटण्यासाठी तयार करण्यात आलेली २ क्विंटल जिलेबी आणि १०५० सामोसे जप्त केले. त्यानंतर गुन्हाही दाखल केला. कोविड नियमावलीचा आणि निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून,  दहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनीच याची माहिती दिली.

Exit mobile version