मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधीचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

जळगाव : प्रतिनिधी । आमदारकीपेक्षा ग्रामपंचायत निवडणूक कठीण असते याची जाणीव असल्याने सल्ला देतोय ; जात , पंथ , भाषा अशा कोणत्याच भेदात राहू नका , पद नसले तरी तळमळ असलेले लोक जनसेवा करतात म्हणून विकासासाठी एक व्हा , राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा असे आवाहन आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिरसोलीकरांना केले .

शिरसोली ग्रामपंचायतीने पूर्ण केलेल्या विविध विकास कामांच्या उदघाटन सोहळ्यात मार्गदर्शन करताना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले कि , तालुक्यात हे ग्रामपंचायत मोठी आहे चालू वर्ष संघर्षाचे ठरले , कोरोनामुळे साहजिकच सर्वच लोकप्रतिनिधींवर नियोजित कामे बाजूला ठेऊन या संकटाची पुढं येण्याची जबाबदारी पडलीय राज्य सरकारला जिल्हा नियोजन समित्यांच्या एकूण निधी पैकी अर्धा निधी कोवाडसाठी देण्याचा निर्णय घ्यावा लागला . आधीच आपला जिल्हा कोविड प्रादुर्भावाने राज्यात गाजला होता जागतिक आरोग्य संघटनेने दुसरी लाट येऊ शकते असा इशारा दिला आहे आता आठवडाभरात जिल्ह्याची परिस्थिती सुधारत असली तरी गाफील राहून चालणार नाही माझा आपल्या मतदारसंघासाठी ८५ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव नियोजित होता तो कोरोनामुळे बाजूला पडला आहे .लंका पुलासाठी १५ कोटी मंजूर आहेत कामे मजूर असली तरी सुरु करता येत नाहीत तरीही पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवू कामांसाठी या ग्रामपंचायतीने राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवला म्हणून सगळेच कौतुकाचे धनी आहेत माझ्याही गावात ग्रामपंचायत बिनविरोध होण्यावर माझा भर असतो एकीनेच गावाचा विकास होतो . लग्नात घरधनी जसा शेवटच्या पंक्तीत जेवतो तसा मंत्री असावा राज्याचा विचार करावा लागतो झुकते माप आपल्या मतदारसंघाला सगळेच देतात स्वच्छतेच्या कामात देशातील जी ३ राज्ये निवडली गेली त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे याचा आनंद आहे पुढच्या ४ वर्षात विकास उभा करायचा आहे माणूस माणसाच्या कामात आला पाहिजे म्हणून तुम्ही एकोप्याने राहा तुमची ग्रामपंचायत बिनविरोध आली तर २५ लाख मिळतील . कोरोनामुळे चांगले लोक आपल्यातून निघून जात आहेत याचे भान ठेवा , असेही ते म्हणाले

. याप्रसंगी शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायतीचे सरपंच कमल रामा भिल, ग्रामपंचायत सदस्य विजय बारी, निळकंठ काटोले, वर्षा बारी, संगीता बारी, प्रशासकीय अधिकारी एम. टी. बागडे उपस्थित होते.

Protected Content