Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मजूराची मोटारसायकल लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपच्या चौकात असलेल्या एका झाडाजवळून एका मजुराची ३० हजार रूपये किंमतीची पल्सर दुचाकी चोरून नेली. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल सुपडू सपकाळे (वय-२४) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. दरम्यान त्याचे काही काम असल्यामुळे तो जळगाव शहरातील गोविंद रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या एका चौकात दुचाकी (एमएच १९ डीबी ५५५२) आला होता. त्यावेळी त्यांनी झाडाजवळ दुचाकी पार्क करून कामानिमित्त निघून गेला. काम आटोपून तो घरी जाण्यासाठी निघाला असता त्याला जागेवर दुचाकी मिळून आली नाही, त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही मिळून आल्याने अखेर मंगळवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.

Exit mobile version