Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खड्ड्यात पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथे शौचालयाच्या टाकीचा उपसा   करण्यास गेलेल्या मजुराचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. याबाबत परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

किनगाव येथे शौचालयाच्या खड्डयाचा उपसा करण्यास गेलेल्या तरुण मजुराचा त्याच खड्डयात कोसळल्याने त्यातच गुदमरून मृत्यु ओढवल्याची दुदैवी घटना घडली आहे. मयताचे नाव शेख भिकन नुरा शेख (वय २५ वर्ष रा. आठवडे बाजार पंचशील नगर ) असे आहे. किनगाव येथे स्टेट बॅक परिसरात  राहणाऱ्यांंकडे आज सकाळी भिकन हा कामास गेला होता. यावेळी  शौचालय टाकीचे उपसा करीत असतांना सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक शौचालयाचे खड्डा कोसळला. यात सुमारे १५ ते २० फुट खोल असलेल्या खड्ड्यात भिकन हा पडून गुदमरून मृत्यु पावल्याची दुदैवी घटना घडली आहे. भिकन यास  यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख यांनी त्यास मृत घोषित केले.  दरम्यान, घरमालकाने हलगर्जीपणा केल्याने भिकन याचा मृत्यू ओढावल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असून घरमालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावल पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरु आहे.

Exit mobile version