Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मका पिकाला अचानक आग; दीड लाखांचे नुकसान

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील झाडी शिवारात अचानक आग लागल्याने शेतातील मका, ठिबक नळ्या व पाईप जळून दीड लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात बुधवारी १७ मे रोजी रात्री ९ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

मारवड पोलीस ठाण्याच्या पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मोगल लोभान भिल वय 40 रा. धानोरा ता. अमळनेर जि.ज ळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतो. मोगल भिल यांचे अमळनेर तालुक्यातील झाडी शिवारात शेत आहे. या शेतामध्ये त्यांनी मका काढून ठेवलेला होता. दरम्यान १७ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास  अचानकपणे ठिणगी पडून मका पिकाला आग लागली, या आगीत मका पिकासह ठिंबक नळ्या आणि पाईप जळून खाक झाले आहे. अंदाजे आगीमुळे दीड लाख रुपयांची नुकसान झाले आहे. ही घटना घडल्यानंतर मोगल भिल यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहे.

Exit mobile version