Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंत्री नवाब मलीक यांचा राजीनामा घ्या; भाजपा यावल तालुक्याची मागणी (व्हिडिओ)

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज अय्युब पटेल | मनी लाँडरिंग प्रकरणी अटक झालेल्या कॅबिनेट मंत्री नवाब मलीक यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अश्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांच्यानेतृत्वाखाली तहसीलदार यांना देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने बॉम्बस्फोट गुन्हेगारांची संबंधित असल्याच्या संशयावरून अटक केली आहे. त्यांना कोर्टाने 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा ताबडतोब शरद पवार यांनी घेतला होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांचा बाबतीत वेगळा निर्णय करत आहे. असे दिसून येत आहे
कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता अशा प्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट या कारवाईचे सर्वांनी समर्थन करायला हवे, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचे जबाब हे कारागृहातून जाऊन घेतलेले आहेत. देशाच्या शत्रुला मदत करणाऱ्यांची गय केली जाऊ नये, मंत्र्यांच्या राजीनामा घेणार नसतील तर राजकारणाचा स्तर खालावेल, देशाच्या शत्रुला मदत करणारे मंत्रिमंडळ देशाला चालणार नाही. हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे. राष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा तातडीने घ्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी राज्यात तीव्र निदर्शने करेल असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, सरचिटणीस विकास चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, योगेश साळुंके, नाना कोळी, सतीश कोळी, रामकृष्ण खेडकर, किशोर कुलकर्णी, अनुराधा परदेशी, सरिता परदेशी, संगीता चौधरी, प्रीती राणे, जि. प. सदस्य सविता भालेराव, डॉ. कांचन फालक, अनिल तेली यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेसबुक व्हिडीओ लिंक :

Exit mobile version