Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंत्री अजय मिश्रा यांच्या विरोधात विविध संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । देशातील लखमीपूर घटनेप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची हाकलपट्टी करून आशीष मिश्रा याला अटक करा या मागणीसाठी आज शहरातील विविध संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना निवेदन देण्यात आले.

लखिमपुर घटनांची सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान न्यायाधीश मार्फत चौकशी करण्यात यावी, दाखल असलेल्या एफ आय आर प्रमाणे केंद्रीय गृहराज्यमंत्री चे चिरंजीव आशिष मिश्रा यांना त्वरित अटक करण्यात यावी, उत्तर प्रदेश सरकार तपास करीत असल्याने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, उत्तर प्रदेश प्रशासनाने शेतकरी हिंसाचारात मरण पावलेल्या यांना प्रत्येकी ४५ लाख, जखमींना १० लाख, व  मृताच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यात आली त्याच धर्तीवर आसाम मधील अल्पसंख्यांक ८०० कुटुंबीयांवर आसाम सरकारने त्यांना घरातून बेघर केले,गोळीबार करून जिवे मारले त्या दोन आंदोलन कर्त्यांना आसम सरकार ने प्रत्येकी ५० लाख रुपये , जखमींना दहा लाख रुपये तसेच मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी ही मागणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी जी हे देशात एक देश एक कायदा याचे फार मोठे पुरस्कर्ते असल्याने उत्तर प्रदेश व आसाम येथे भाजप सरकार असल्याने त्यांनी यूपी शासनाच्या नियमाप्रमाणे आसाम सरकारला आदेश द्यावेत. तसेच लखिमपुर येथे जाणाऱ्या विरोधी पक्ष  नेत्यांचा अटकाव करू नये व अटक केलेल्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे.

याची उपस्थिती
निदर्शनाचे आयोजक जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, लोकसंघर्ष मोर्चा चे सुमित साळुंखे व  कलींदर तडवी, मौलिक विचार मंचचे अध्यक्ष मुफ्ती हारुन, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर खान, शिवसेनेचे महानगराध्यक्ष जाकिर पठाण, समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव रईस बागवान,काँग्रेस आयचे बाबा देशमुख व नदीम काझी, भारत मुक्ती मोर्चाचे फहिम पटेल, शाही बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष हबीबोद्दीन शेख, वहीदत ए इस्लामी चे अतिक शेख, इद गाह ट्रस्टचे अनिस शहा , अल खैर ट्रस्टचे युसुफ शाह, युवा मन्यार बिरादरीचे अश्फाक शेख व हारिष सैयद, शिकलगर बिरादरीचे अन्वर खान व मुजाहिद खान, मार्क्‍सवादी पक्षाचे अकील खान करीम खान, अपंग संस्थेचे अब्दुल कादर शेख मुसा, मरकज चे सय्यद रिजवान, नूतन मराठा कॉलेज चे निवृत्त हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर एम ईकबाल शेख, कास्ट्राईब संघटनेचे वसंत सपकाळे, पटेल बिरादरीचे अकील अहमद पटेल ,श्रीधर चव्हाण अश्फाक शेख, हमीद शेख आरिफ अब्दुल रशीद, निखिल वाणी, शाहूनगर मित्रमंडळाचे फिरोज शेख, समाजवादी चे शेख शेखु आदींची उपस्थिती होती.

Exit mobile version