Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंत्रीमंडळ विस्तार न करण्यासाठी कशाची भिती आहे ? : अजित पवार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन बराच काळ उलटला तरी मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यासाठी कशाची भिती आहे ? असा प्रश्‍न आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारला आहे.

अजित पवारांचा बारामतीमध्ये जनता दरबार पार पडला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालांना लवकरात लवकर मंत्रीमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे असं सांगितलं आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. ताबडतोब अधिवेशन बोलवलं पाहिजे.

अजित पवार म्हणाले की, नेहमी जुलै महिन्यात अधिवेशन होत असतं, पण आता ऑगस्ट महिना उजाडला आहे. एक महिना होऊन गेला तरी यांना मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. यांना मुहूर्त, हिरवा झेंडा मिळेना की त्यांच्यात एकवाक्यता होत नाही. मंत्रीमंडळ विस्तार करण्यासाठी का घाबरत आहेत हे कळण्यास काही मार्ग नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Exit mobile version