Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंत्रालयाबाहेर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

 

मुंबई : वृत्तसंस्था । स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. दुसरीकडे मंत्रालयाच्या परिसरात जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

आत्महदहनचा प्रयत्न करणार शेतकरी मुळचा जळगावमधील असून, सुनील गुजर असं त्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. मका व सोयाबीन व्यवहारात आडकाठी होत असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि यातूनच या शेतकऱ्याने आज मंत्रालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात ध्वजारोहण करून बाहेर पडल्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली व सुरक्षा व्यवस्थेत थोडी शिथिलता आल्यानंतर या शेतकऱ्याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं व अनर्थ टळला. सध्या त्या शेतकऱ्यास मरिनड्राईव्ह या पोलीस स्टेशनला नेण्यात आलं असून, चौकशी सुरू आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे

 

Exit mobile version