Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंगळग्रह मंदिरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन

अमळनेर, प्रतिनिधी| येथील मंगळग्रह मंदिरात लक्ष्मीपूजन निमित्ताने पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजन कुलकर्णी दाम्पत्याच्या हस्ते आज करण्यात आले.

अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात लक्ष्मीपूजन निमित्त पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजन मुंबई येथील सॉफ्टवेअर इंजिनियर अनिकेत कुलकर्णी व त्यांच्या पत्नी चारू कुलकर्णी या दाम्पत्याच्या हस्ते आज करण्यात आले. दरम्यान मंदिरात रोषणाई तसेच पानाफुलांची व रांगोळीची विशेष सजावट करण्यात आली होती. यावेळी देवाला विविध पदार्थांचा भोग लावण्यात आले. प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. तर जयेंद्र वैद्य व तुषार दीक्षित यांनी सहकार्य केले.

यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहीरम , खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त जयश्री साबे, डी.ए. सोनवणे, सेवेकरी शरद कुलकर्णी खिलू ढाके यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

 

Exit mobile version