Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे लाक्षणिक उपोषण (व्हिडीओ)

जळगाव राहूल शिरसाळे । भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेने पाचशे कोटी रूपयांचा घोटाळा पुराव्यासहित उघडकीला आणूनही शासानाकडून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भ्रष्ट्राचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे संस्थापक अध्यक्षक रघुनाथ कांबळे यांनी सोलापूर जिल्ह्यातल कुर्डूवाडी नगरपरिषेदत सुमारे ५०० कोटी रूपयांचा घोटाळा पुराव्यासह उघडकीला आणलेला आहे. याबाबत अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

संस्थापक अध्यक्ष यांनी या घोटाळा उघडकीला आणल्यानंतर पुरावा दिला आहे. संबंधित आणि जबाबदार अधिकाऱ्यांना देऊन सुध्दा गुन्ह्याची नोंद झालेले नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वैद्य गणेश घोपे, सचिव विनोद बेरभैयाजी,  उपसचिव रितेश नेवे, कार्याध्यक्ष हिम्मतराव पाटील, महानगर अध्यक्ष, दिलीपराव साळुंके, संपर्कप्रमुख, अतुल महाजन, राजू सपकाळे, अरुण सपकाळे, तालुकाध्यक्ष सलीम मन्यार, रसूल मन्यार, आसिफ मन्यार , सुरेखाताई कोळी, संगीता वरुळकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version