Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भ्रष्टाचार निर्मूलनार्थ तरुणाईने पुढे यावे – पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाटील

जळगाव, प्रतिनिधी | लाच देणे आणि घेणे हा दंडनीय अपराध असून संपूर्ण समाजस्वास्थ्यासाठी तरुणाईसह समाजातील सर्वच घटकांनी भ्रष्टाचार निर्मूलनार्थ शासनास सहकार्य करावे असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी केले.

 

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्था संचालित नूतन मराठा महाविद्यालयात ते 1988 चा भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यातील तरतुदी या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील होते तर मंचावर उपप्राचार्य डॉ. एस. ए. गायकवाड, प्रा. राजेंद्र देशमुख प्रा.आर. बी. देशमुख व दिनेशसिंग पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. माधुरी पाटील यांनी केले. मान्यवरांचे स्वागत उपप्राचार्य यांनी केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी केले. अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील यांनी तरुणांना भ्रष्टाचार निर्मूलनाच्या कार्यात सहभागी होऊन सामाजिक दायित्व निभवावेअसे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ. राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन व प्रा.डॉ. माधुरी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील, जनार्दन चौधरी मनोज जोशी, मनोज सोमवंशी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version