Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भोरगाव लेवा पंचायतीला ‘आपले हंबर्डी गाव’ पुस्तक भेट

WhatsApp Image 2019 07 21 at 9.47.03 PM

यावल, प्रतिनिधी | हंबर्डी गावाचा इतिहास, रूढी, परंपरा आदींची माहिती असणारे ‘आपले हंबर्डी गाव’ हे पुस्तक लेखक खेमचंद पाटील यांनी कुटूंबनायक रमेशदादा विठू पाटील यांना भेट दिले.

यावल तालुक्यातील पाडळसा येथील लेवा पाटीदार समाजाची भोरगांव लेवा पंचायतीला स्थापनेस सुमारे २५० वर्ष झाले आहेत. लेवा समाजाची मातृसंस्था म्हणून ओळखली जाणारी व न्यायीक दर्जा प्राप्त झालेल्या भोरगांव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेशदादा विठू  पाटील यांना व भोरगांव लेवा पंचायतला ‘आपले हंबर्डी गाव’ पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले. या पुस्तकात हंबर्डी गावातील ग्रामस्थाच्या रूढी, परंपरा , धार्मिक, शौक्षणिक, कृषी, सामाजिक, सांस्कृतीक, नोकरदार वर्ग, उदोजक, डॉक्टर ,वकील, राजकीय यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा परिचय या पुस्तकात लेखक खेमचंद पाटील यांनी करून दिला आहे. भावी पिढीला गावाबद्दलची १५६२ पासूनची संपूर्ण माहिती उपलब्ध करून ठेवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केला असल्याचे खेमचंद पाटील यांनी यावेळी सांगितले. कुटूंबनायक रमेशदादा विठू पाटील, फिरके भाऊसाहेब , वाय. पी. बह्राटे , सेवानिवृत्त पाटबंधारे अभियंता. सरला वारके यांच्यासह पंचायतीचे सदस्य यांनी खेमचंद पाटील यांना शुभेच्छा देऊन स्वागत केले.

Exit mobile version