Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भोणे येथे बौद्ध धम्म संस्कार शिबिराचे आयोजन

धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील भोणे गावात रविवार ८ मार्च रोजी एक दिवशीय बौद्ध धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन भंतेजी नागसेन यांनी केले होते.

भंतेजी नागसेन यांनी बौद्ध धम्म संस्कारांवर धम्म देश ना केली. भंतेजी नागसेन यांनी प्रत्येक व्यकतीने धम्म संस्कार मनापासुन शिकवण घेतली पाहीजे तरच आपण खरे बौद्ध होऊ शकतो. तरी बौद्ध उपासक उपासीका यांनी बुद्धांची शिकवनीचे आचरण करावे हा आपला अधिष्ठान असला पाहीजे असे आवाहन केले. दरम्यान, भंतेजींनी २६ जानेवारी २०२० रोजी प्रथम नागवनशीय बौद्ध धम्म परिषद गौतम नगर धरणगाव या ठीकाणी घेतले होते. रविवार ८ मार्च २०२० रोजी एक दिवशीय बौद्ध धम्म शिबिर भोणे गावात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी बौद्ध उपासक उपासीका हजारोचा संख्येने उपस्थित होते. भोणे गावातील बी. आर. आंबेडकर ग्रुप व बौद्ध उपासक उपासीका संघ भोणे यांनी भंतेजी नागसेन यांचे फूल देऊन साधु साधु साधु बोलून आनंद व्यक्त केला. धम्म संस्कार शिबिरामध्ये सगळ्यांचे मन आनंद व मंगलमय वातावरण निर्माण झाले होते व शेवटी भंतेजी नागसेन म्हणाले सबका मंगल हो……धम्म संस्कार शिबिर संमापण झाले.

Exit mobile version