Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भोकर नदीवरील पुनखेड्याचा पुल ठरला भ्रष्टाचाराच्या चक्रव्यूहात

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पुनखेडाच्या भोकर नदीवर स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी बनविला रेल्वेच्या पुला वरुन आजही शेकडो रेल्वे दरोरोज ये-जा करतात तर त्याच्याच खाली महाराष्ट्रा शासनाच्या इंजिनियरने तयार केलेला पूल भष्ट्राचार आणि निकृष्ट्राच्या चक्रव्यूहात अडकुन भोकर नदीवरुन मुक्ती मांगत आहे.

पूर्वीच्या इंग्रजांनी रेल्वेसाठी तर आताच्या महाराष्ट्र शासनाने वाहनांसाठी पुनखेडा नजिक वेग-वेगळे पुल जनतेसाठी तयार केले आहे. यात भष्ट्राचार आणि इमानदारी केलेल्या पुलांची पाहणी करायची असेल तर रावेर तालुक्यातील पुनखेडा नजिक भोकर नदीवर यावे लागेल म्हणजे याचा प्रत्यक्ष अनुभव आल्या शिवाय राहणार नाही इंग्रजांनी केलेले ईमादारी आणि महेनतीच्या पुलावरुन शेकडो रेल्वे गाड्या दरोरोज ये-जा करतात तर भष्ट्राचार आणि निकृष्टमुळे तयार झालेल्या पुल वाहनांसाठी वाहतुकीसाठी बंद आहे.पावसाळ्यात भोकर नदीला पाणी आल्या नंतर या परिसरातील नागरीक, विद्यार्थी महाराष्ट्र शासनाचा पुल बंद राहत असल्याने इंग्रजांनी बनवीलेल्या पुला वरुन रावेरच्या दिशेने येतात आजही या गावच्या नागरीकांना या पुला बद्दल विचारले असता त्यांनी भष्ट्राचार व निकृष्टमिक्स पुला बद्दल प्रचंड संताप व्यक्त केला आपल्या पेक्षा इंग्रज बरे होते असे सांगत अनेकवेळा या पुलाची दुरुस्ती झाली पण निकृष्टमुळे लगेच हा पुल मरणा अवस्थेत गेला आहे असे येथील नागरीक सांगतात

लोकप्रतिनिधींच्या भावना बोथड
पुनखेडा भोकर नदी वरील पूला बाबत स्थानिक लोकप्रतिनिधिच्या भावना बोथड झालेल्या दिसतात खासदार रक्षा खडसे रावेरला येतांना याच पुलावरुन येतात परंतु त्यांनी देखिल पुला बाबत सोइस्कर दुर्लक्ष केले आहे. तर स्थानिक आमदार,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य या लोकप्रतिनिधीचे देखिल दुर्लक्ष आहे.

पावसाळ्यात पुल असतो बंद
आता उन्हाळा सुरु असून पावसाळ्यात तर हा पुल पूर्ण पण वातुकीसाठी बंद असतो म्हणून पुनखेडा, पातोंडी भागातील लोक विद्यार्थी इंग्रजकालीन रेल्वे पुलावरुन आपली वाट काढतात त्यामुळे याभागातील खुप त्रस्त आहेत.

Exit mobile version