Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भोकर गावातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भोकर गावात नातेवाईकांकडे आलेल्या तरूणाची दुचाकी मध्यरात्री घरासमोरून चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक शिवाजी सोनवणे (वय-३५,रा.  एरंडोल) हे दुचाकी (एमएच१९ एडब्ल्यू २५०८) ने जळगाव तालुक्यातील भोकर येथे राहणारे त्यांचे नातेवाईक अरविंद शिवदास सोनवणे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या घरासमोर दुचाकी पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेली. हा प्रकार २६ मार्च रोजी पहाटे ६ वाजता समोर उघडकीला आला आहे. दीपक सोनवणे यांनी त्यांचा दुचाकीचा गावात सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकीची कुठलीही माहिती न मिळाल्याने अखेर त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवार २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.

Exit mobile version