Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भोकरबारी येथील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील भोकरबारी येथील संदीप प्रकाश बडगुजर (वय ३५) या तरुण शेतकर्‍याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

संदीप बडगुजर याने राहत्या घरातील स्लॅबच्या बंगळीच्या कडीला लेडीज रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजले नाही.
गावातील विनोद गंगाराम पाटील यांनी पाहिल्यानंतर त्यांनी उपसरपंच भानसिंग राजपूत यांना कळविले. त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर भानसिंग पाटील, गणसिंग संतोष पाटील, राहुल तुकाराम पाटील, भास्कर पोपट पाटील यांनी त्याचे पार्थिव ईश्‍वर ठाकूर यांच्या रुग्णवाहिकेतून कुटीर रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे यांनी तपासून मयत असल्याचे घोषित केले.

उपसरपंच भानसिंग राजपूत यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश चौधरी करत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version