Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भूषण कॉलनी परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भूषण कॉलनी परिसरातून एका पेंटर काम करणाऱ्या तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मुकेश रघुनाथ चौभे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हा तरूण परिवारासह वास्तव्याला आहे. पेंटरचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. भूषण कॉलनी परिसरात त्याने पेंटर करण्याचे काम घेतले होते. ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता मुकेश चौभे हा त्याची दुचाकी (एमएच १९ सीटी ३८६७) ने कामावर आलेला होता. भूषण कॉलनीतील काशीविश्वनाथ मंदीराजवळ त्याने दुचाकी पार्किंगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांने त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शनिवारी २५ मार्च रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी करीत आहे.

Exit mobile version