Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भूक लागली की मध्यान्हीचा चंद्र दिसताे भाकरीसारखा !

 

भुसावळ  : प्रतिनिधी |  वेदनेचा तळ शाेधण्याचं सामर्थ्य फार कमी लाेकांमध्ये असते. पण ज्यांच्यात ते असते ते इतिहास घडवतात. माय-बाप अायुष्याचे संचित अाहे. बापाच्या काळजातून अाई वजा करता येत नाही. नर्तकी असली तरी प्रत्येक बाईत अाई असते भूक लागली की मध्यान्हीचा चंद्र भाकरीसारखा दिसताे, असा संदेश सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी दिला.

 

भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंच्या माताेश्री द्वारकाबाई नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय द्वारकाई अाॅनलाइन व्याख्यानमाला घेतली जाते अाहे. त्यात ‘वेदनेचा तळ शाेधणारी कविता’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफताना दंगलकार चंदनशीवे हे बाेलत हाेते.

 

प्रास्ताविक उमेश नेमाडेंनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चाैधरी हाेते. सांस्कृतिक दूत स्वर्गीय अरुण मांडळकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे हे यंदाचे सातवे वर्ष अाहे. त्यांची उणीव भासते अाहे, अशी भावना सूत्रसंचालन करताना समन्वयक गणेश फेगडे यांनी व्यक्त केली. तंत्रसहाय्य पुणे बालभारतीचे सदस्य डाॅ. जगदीश पाटील, भुसावळच्या काेटेचा महिला महाविद्यालयाचे प्रा. डाॅ. गिरीश काेळी यांचे लाभले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय गणेश फाउंडेशन व जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ, जय गणेश स्पाेर्ट‌्स क्लब यांनी सहकार्य केले.

 

‘पाखरांच्या चाेचीमधला घास व्हावी कविता, पहिला अाणि शेवटचा श्वास व्हावी कविता’ या अाेळींतून दंगलकार चंदनशीवेंनी रसिकांना साद घातली. माणसाला उजेडात अाणण्याचं सामर्थ्य शब्दात अाहे; पण ते कसे वापरावे यासाठी डाेळे उघडे ठेवायला हवे. ‘दिवाळीला घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटते मला, लाेक हरामी घराचा रंग पाहून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी सगळं घरच पांढरंशुभ्र केलं…मी जातीला चुना लावला अाणि मी माणसात अालाे’ या कवितेतून त्यांनी जातीभेदाची वेदना मांडून त्यावरचं उत्तरही दिलं

 

काेराेना  काळात बंद झालेल्या शाळेचे मनाेगत त्यांनी ‘मी तुमची शाळा बाेलतेय’ कवितेतून मांडले. ‘भींती मुक्या झाल्यात फळा रूसलाय रे, खडू उमटलाच नाही कित्येक काळ ताटातुट झालीस त्यांची’ या अाेळी थेट हृदयाला भिडल्या. ‘मी वेदनेचा बाजार मांडणारा माणूस नसून बाजाराच्या वेदना मांडणारा सरळ साधा कवितेचा हमाल अाहे’ या कवितेतून त्यांनी कवितेची पालखी वाहून नेण्याचा अानंद असल्याचे अधाेरेखीत केले. ‘पांडुरंगा’ या कवितेतून शेतकरी अात्महत्या हा संवेदनशील विषय ताकदीने मांडण्याचा प्रयत्न केला.

 

तमाशाशी माझं जवळचं नातं अाहे. भूक लागली म्हणजे मध्यान्हीचा चंद्र दूरवर अाता भाकरीसारखा दिसू लागताे असं सांगत चंदशीवे यांनी ‘तमाशा’ नावाची कविता सादर केली. त्यातील ‘मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात, माेगऱ्याचे चांदणे माळते मी वेणीच्या अंबरात’ व ‘तमाशाच्या फडामध्ये पायात घुंगरू बांधून अायुष्यभर नाचणाऱ्या बाईत मला अाई दिसते’ या अाेळी रसिकांच्या थेट हृदयाला भिडल्या.

 

तीन दिवसीय द्वारकाई अाॅनलाइन व्याख्यानमालेचे समाराेपाचे तृतीय पुष्प २९ जुलै राेजी सवना (जिल्हा यवतमाळ) येथील गझलकार अाबिद मन्सूर शेख हे सकाळी झूम मिटिंगद्वारे गुंफतील. ‘अशी बहरली कविता’ हा त्यांचा विषय अाहे.

 

Exit mobile version