Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथे स्व.मामाजींना भावपूर्ण श्रद्धांजली

भुसावळ प्रतिनिधी ।  येथील बियाणी मिलिटरी स्कूल येथे स्व.बी.सी.बियाणी (मामाजी) यांना त्यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली देण्यात आली.

याप्रसंगी बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सर्व शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षकवृंद उपस्थित होते. सर्वप्रथम कांताबाई बियाणी,बियाणी संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव संगीता बियाणी, उपाध्यक्ष विनोद बियाणी, संचालिका स्मिता बियाणी, रोनक बियाणी, डॉ.मुस्कान बियाणी व परीवारातील सर्व सदस्यांनी स्वर्गीय बि.सी बियाणी मामाजींच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केले. त्यानंतर 2 मिनिटांचे मौन पाळून मामजींना श्रद्धांजली देण्यात आली.

मिलिटरी स्कूलचा विद्यार्थ्यांनी याप्रसंगी मामाजींना मानवंदना दिली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राचार्य डी.एम.पाटील व एस.आर.पाटील यांनी केले.या प्रसंगी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते. तसेच भुसावळ चे आमदार संजय सावकारे, रजनी सावकारे, प्रमोद सावकारे, प्रा.सुनील नेवे, पुरुषोत्तम नारखेडे, दिनेश नेमाडे, अमोल इंगळे, पिंटू कोठारी, देवा वाणी, बापू महाजन, गिरीश महाजन, परिशित बराटे, पप्पू बारसे, सुर्जित बाबूजी, निक्की बात्रा, अजय नागराणी, सतीश सपकाळे, ॲड.निर्मल दायमा, राजीव पाटील, प्रवीण भराडिया, गोपाल तिवारी, आर के पाटील  यांच्या सह मान्यवर असंख्य संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी स्वर्गीय  मामाजी यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Exit mobile version