Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथे स्व. बियाणी स्मृती चषकाचा मानकरी जळगावचा संघ

bhusawal1 1

भुसावळ प्रतिनिधी । माहेश्वरी समाज, माहेश्वरी तहसील सभा एवं माहेश्वरी युवा संगठन यांच्यातर्फे आयोजित स्व.बी.सी.बियाणी स्मृति चषक माहेश्वरी क्रिकेट चैंपियनशिप जिल्हास्तरीय माहेश्वरी समाज क्रिकेट चैंपियनशिप क्रिकेट मॅच नुकतीच झाली.

जळगाव, पाळधी, कासोदा, भुसावळ येथील क्रिकेट संघ सहभागी झाले होते. सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येत प्रेक्षक उपस्थित होते फायनल सामना जळगाव (अ) विरुद्ध जळगाव (ब)मध्ये अटी तटीत पार पडला. त्यामध्ये जळगाव (अ) संघ स्व.बी.सी. बियाणी स्मृती चषकाचा मानकरी ठरला तर उत्कृष्ट फलंदाज राहुल झवर, उत्कृष्ट गोलंदाज स्मितेश बिर्ला, म्यान ऑफ द मॅच केतन पोरवाल यांनी पटकाविला.

विजेत्या – उपविजेत्या संघाला कांताबाई बियाणी, मनोज बियाणी, संगीता बियाणी, शंकरलाल झवर, द्वारकादास दरगड, प्रविण भराडीया, घनश्याम मंडोरे, वरिष्ठ महिला मंडळ अध्यक्ष अयोध्याबाई मंत्री, महिला मंडळ अध्यक्ष मनीषा काबरा यांच्याहस्ते चषक व मेडल देण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख सुनील हेडा, चेतन भराडीया, यश हेडा, आशिष आगीवाल सोबत पंच म्हणून एच.एन.पाटील, विपुल नारखेडे, सर्वेश शिंदे, स्वप्नील पाटील, समालोचक रुद्रसेन गंठीया, स्कोअरर शैलेश बावणे यांना मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयुर नागोरी, संजय लाहोटी, सर्वेश लाहोटी, सचिन हेडा, माहेश्वरी समाजाचे तहसील सभाचे, युवा संघटनचे सर्व सदस्याचे सहकार्य मिळाले. सूत्रसंचालन रवींद्र तायडे, आभार प्रदर्शन डी.एम.पाटील यांनी केले.

Exit mobile version