Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथील सर क्लायमेंट इंग्लिस स्कुलमध्ये ध्वजारोहण 

भुसावळ, प्रतिनिधी तालुक्यातील खडका शिवारातील सर क्लायमेंट इग्लिश स्कूल मध्ये आज 74 वा स्वातंत्र्य दिन उत्सवात साजरा करण्यात आला.  SBN Marathi चँनलचे भुसावळ तालुका प्रतिनिधी सुनिल आराक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 शासनाच्या शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करण्यात आले. चेअरमन जी.बी.खान , अमिर खानसर , शाळेच्या प्रिन्सिपल शिल्पा आराक, शिक्षिका वैशाली खराडे , शिरीन शेख यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शाळेचे आवार नेहमी विद्यार्थ्यांनी गजबजलेले दिसायचे मात्र आज प्रथमच कोरोना मुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शाळेत विद्यार्थी नसल्याने त्यांची अनुपस्थिती जाणवत होती शाळेच्या आवारात शुकशुकाट दिसुन येत होता.

Exit mobile version