Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथील खडका रोड परिसरात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील खडका रोड परिसरातील लाल बिल्डिंगजवळ दावते इस्लामी हिंदच्या वतीने वृक्षारोपण मोहीमेचा शुभारंभ २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, नगरपरिषदेचे भाजपा गटनेता हाजी मुन्ना तेली, माजी उपनगराध्यक्ष हाजी शफी पहेलवान, माजी नगरसेवक हाजी आशिक खान, हाजी साबीर शेख, मुस्लिम नुमाईंदा कौंन्सिलचे अध्यक्ष हाजी सलीमशे चुडीवाले, दात ए इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सदस्य हाजी सलीम अत्तारी, मौलाना नूर आलम, मौलाना अब्दुल हकीम, मौलाना गुलाम सरवर, दावत ए-इस्‍लामी मिडीया सेलचे रफिक रोशन शेख आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

Exit mobile version