Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ नगरपरिषद व पोलीस स्थानकात महापुरूष नेताजी व शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील नगरपारिषद आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात स्व. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्याहस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनला स्व.नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बंटी कापडणे, किशोर मोरे, किशोर कुमावत, हेमंत जांगडे हे उपस्थित होते.

भुसावळ शहरातील नगरपरिषदेच्या सभागृहात स्व.नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, सभा अधिक्षक परवेज शेख, बांधकाम विभाग अभियंता विजय तोष्णीवल, आस्थापना विभाग प्रमुख चेतन पाटील, आस्थापना विभाग लिपिक वैभव पवार, देविदास मंदावडे , प्रमोद मेढे व आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version