Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ जेलमधून कैदी फरार; सिनेस्टाईल पाठलाग करून अटक

भुसावळ प्रतिनिधी । येथील कारागृहातून शिताफीने पळ काढणार्‍या कैद्याला पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केल्याची खळबळजनक घटना आज घडली.

याबाबत वृत्त असे की, आकाश श्रीओम बारसे (राहणार चांदमारी चाळ) यास अलीकडेच अटक करण्यात आली असून तो सध्या येथील कारागृहात आहे. आज सकाळी तुरुंग अधिकारी व कर्मचार्‍यांनी कैद्यांना जेवणासाठी बाहेर काढले. यावेळी आकाश बोरसे हा लघवीचे निमित्त करून मुतारीत गेला. तेथून तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूमवर चढून भिंतीवरून उडी मारून त्याने पलायन केले. हा प्रकार कारागृह शिपायाच्या लक्षात आला असता, त्यांनी आरडाओरड केली. यावेळी काही अधिकारी, कर्मचार्‍यांनीनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांना हा प्रकार सांगितला. तेव्हा पोलिसांनी फरार आरोपीचा पाठलाग केला असता, तो डी. एस. हायस्कूल च्या पाठीमागून पळाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी पाठलाग करून रेल्वे न्यायालय आवारात लपून बसलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि पुन्हा कारागृहात टाकले. याबाबत तुरुंग रक्षक भानुदास यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये हा कैदी फरार झाल्याने त्याला अटक करण्यात लवकर यश मिळाले. जर दैनंदिन व्यवहार सुरू असते तर त्याने पोबारा केला असता. या घटनेमुळे पोलीस प्रशासनावर काही काळ तणाव आला. यातून कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा देखील चव्हाट्यावर आला आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version