Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ केंद्रीय विद्यालयामध्ये दहावीच्या पेपरला विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी ; एक जखमी

 

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील केंद्रीय विद्यालयामध्ये सी.बी.एस.सी.बोर्डाची दहावीची परीक्षा सुरू असून दिनांक 26 फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाच्या पेपरला रेल्वे स्कुलचे विद्यार्थी व बाहेरील तरुणांमध्ये वाद झाला होता. आजरोजी त्यांचे रूपांतर हाणामारीत होऊन त्यात एक विदयार्थी जखमी झाला आहे.

 

सुभाष नगर भागातील केंद्रीय विद्यालयात सी.बी.एस.सी.बोर्डाची दहावीची परीक्षा सुरू असून दिनांक 26 फेब्रुवारी 2020 रोजी इंग्रजी विषयाच्या पेपरला रेल्वे स्कुलचा विद्यार्थी यश पवार व बाहेरील तरुणाचा वाद झाला होता.त्या वादाला ताप्ती स्कुलचे विद्यार्थी रोहन नरेंद्र पाटील व ओम चौधरी यांनी मिटविला होता.दिनांक 29 फेब्रुवारीला दहावीचा हिंदी विषयाचा पेपर सुरू असतांना यश पवार यांनी केंद्रीय विद्यालयात बाहेरील मुलांना बोलावून रोहन नरेंद्र पाटील याला फायटरने, लाठ्याकाठ्यानी मारून जखमी केले तर ओम चौधरी याला हाताच्या नखांनी भोसकुन पाठीला फायटर व मुक्कामारही मारल्याची घटना घडल्याने शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Exit mobile version