Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात २ लाख ३५ हजाराचा दारूसाठा जप्त

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील कपाट बनविण्याच्या गोडाऊनमध्ये २ लाख ३५ हजार रूपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. संचारबंदी असता विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कपाट बनविण्याच्या गोडाऊनमध्ये संचारबंदीत मध्ये जादा दराने देशी- विदेशी दारूची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड यांना मिळल्यावरून सपोनि संदीप परदेशी, अनिल मोरे यांनी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बाजारपेठचे पो.ना. इरफान काझी, पो.ना. दीपक पाटील, पो.ना. रमण सुरळकर, पोहेकॉ युवराज नागरुत, पोहेकॉ माणिक सपकाळे, प्रशांत परदेशी, पोहेकॉ आयज शेख तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिकारी कल्याणमुळे व कॉन्स्टेबल नंदू पवार यांनी मिळून सामूहिक कामगिरी केली.

दारूसाठा राज्य उत्पादन शुक्लाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा केला. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.

Exit mobile version