Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात हद्दपार आरोपीस अटक

 

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ पोलीसांनी कोंबीग ऑपरेशनमध्ये हद्दपार केलेला आरोपीस अटक करण्यात आली. याप्रकरणी भुसावळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रायसिंग सरदारसिंग पंडीत (टोळ प्रमुख) रा. वाल्मिकी नगर भुसावळ यांच्याविरोधात भुसावळ पोलीसात भाग ६, गुरनं ८४/२०२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांना सदरील आरोपी भुसावळात आल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत आरोपीस अटक करण्यात आली.

सदरील कारवाई
पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सपोनि अनिल मोरे, संदीप परदेशी, स.फौ. तस्लिम पठाण, पो.हे.कॉ. सुनिल जोशी, पो.ना.रविंद्र बिर्हाडे, नेव्हील बाटली, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, पो.का.विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, तुषार पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी अशानी केली आहे.

Exit mobile version