Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; हायस्कुलमध्ये भरलेल्या बाजारात ग्राहकांची गर्दी

भुसावळ प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस जिल्ह्यासह राज्यात वाढत असल्याने ३ मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान भुसावळात आजपर्यंत एकुण ६ रूग्ण कोरोनाबाधीत आढळून आले असतांना म्यून्सीपल हायस्कूलच्या प्रांगणात भरलेल्या बाजारात ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगन वापरता एकच गर्दी केली होती.

भुसावळ शहरात 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरात लॉकडाउन सहीत रुग्ण आढळलेल्या भागात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. बाजारात विक्रेते आणि ग्राहकांनी शासनाने ठरवून दिलेल्या सर्वच नियमांची पायमल्ली झालेली दिसून आली. तर प्रशासनानेही यावर कोणतीही काळजी घेतली नसल्याचे दिसून आली. या गर्दीमुळे जर कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरला तर त्याला जबाबदार कोण ? आमदार संजय सावकारे यांनी गेल्या ४ दिवसापासून भुसावळ शहर पुर्णपणे बंद करा, शहराच्या सीमा सील करा अशी मागणी केली होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुद्धा आमदार साहेबांच्या मागणीला दुजोरा दिला आहे. प्रशासन आता कशाची वाट पाहत आहे. हाच मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Exit mobile version