Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात शिवाजी नगरात सट्टा कारवाई

FIR

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर भागात देशी दारू दुकानाच्या मागे सट्टा खेळणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांकडून १४ हजार ५३२ रूपयांचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला आहे.  

अधिक माहिती अशी की, फिर्यादी पोकॉ ईश्वर भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहरातील शिवाजी नगर भागात दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजी ५.५ वाजेच्या सुमारास हसमत खाँ देशी दारू मागे गोडावून मध्ये आरोपी सतिष साहेबराव अहिरे वय २९ राहणार शिवाजी नगर भुसावळ.दिलीप उत्तमराव भालेराव वय ३५ राहणार सुदगाव तालुका रावेर ,शंकर रज्जाक पटेल वय ५८ राहणार मुस्लिम कॉलनी भुसावळ, हसमत खाँ देशी दारू दुकान मालक पूर्ण नाव माहीत नाही हे स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण मटका नावाचा खेळ खेळवित असतांना मिळून आले असून यांच्या कडून सट्टा जुगार खेळण्याचे सहित्य ८०३२ रुपये रोख तसेच ९६५०० रुपयांचे तीन मोबाईल फोन असे एकूण १४,५३२ रुपयांचा मुद्देमालसह चौघांविरुद्ध कारवाई करण्यात अली आहे.

Exit mobile version