Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात वादळी पाऊस : नवीन इमारतीची भिंत कोसळली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरासह परिसरात आज दुपारी वादळी पावसाने हजेरी लावली असून यात ब्राह्मण संघाजवळ एका नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतीची भिंत कोसळली.

 

गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र आणि कडाक्याच्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या भुसावळकरांना आज दुपारी आलेल्या पावसामुळे अल्प का होईना दिलासा मिळाला आहे. दुपारी बारा वाजेनंतर शहरात जोरदार जलधारा कोसळल्या. यासोबत वादळी वारा असल्याने मात्र अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडीत झाला. तर काही ठिकाणी पत्रे उडाल्याचेही दिसून आले.

 

दरम्यान, वादळी वार्‍यांमुळे ब्राह्मण संघाजवळच्या रिदम हॉस्पीटलच्या बाजूला नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतीची भिंत खाली कोसळली. सुदैवाने याप्रसंगी खाली कुणीही नसल्याने अनर्थ टळला. तर, भिंत कोसळतांनाचा व्हिडीओ हा सोशल मीडिात व्हायरल झाला आहे.

Exit mobile version