Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात मोबाईल चोरणार्‍यास अटक

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स परिसरातील मोबाईल शॉपीमधून हँडसेट चोरी करणार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, छत्रपती शिवाजी कॉम्पलेक्स मध्ये रविंद्र प्रकाश बाविस्कर (वय-३८ रा.अयोध्या नगर हुडको कॉलनी भुसावळ) यांच्या मालकीचे दुकान नं. २२ श्री साई मोबाईल शॉपी या दुकानाचे कोणीतरी संशयीत व्यक्तीने कुलुप तोडण्यात आले होते. यात २५००/- रु किमतीचा माल कोणीतरी संशयीत व्यक्तीने चोरुन नेलेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते भु.बा.पेठ पो.स्टेला तक्रार देण्यासाठी आले असता त्यांच्या फिर्यादी नुसार भु.बा.पेठ पो.स्टे ला भाग ५ गु.र.न ३९८ /२०२० भा.द.वि क. ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या संदर्भात विशाल मधुकर धांडे (वय-३० रा.विठ्ठल मंदिर वॉर्ड भुसावळ) या संशयिताला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई डीवायएसपी गजानन राठोड व पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल मोरे, संदिप परदेशी, रविंद्र बिर्‍हाडे,यासिन पिंजारी, रमण सुरळकर,महेश चौधरी,उमाकांत पाटील,तुषार पाटील पो.कॉ.कृष्णा देशमुख ,विकास सातदिवे,दिनेश कापडणे, ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी यांच्या पथकाने केली. या गुन्हयाचा तपास पो.ना महेश चौधरी करीत आहे

Exit mobile version