Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । मुलीचे नेहमी नाव घेत असल्याने जाब विचारणाऱ्या तरूणाला शिवीगाळ व काठीने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी एकावर भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी शेख जुबेर शेख अलीम पिंजारी (वय-२५) रा. नुराणी नगर भुसावळ यांच्या पुतणीचे संशयित आरोपी शेख रिजवान शेख रिजवान शेख अख्तर रा. नवीन बीझेड हायस्कुल हा कायम नाव घेत असल्याचे विचारणा केल्याचा राग आल्याने संशयित आरोपी शेख रिजवान याने शेख जुबेर याला शिवीगाळ करून मारहाण केली तर लाकडी काठी डोक्यात टाकून दुखापत केली. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीसात शेख जुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संदेश निकम करीत आहे.

Exit mobile version