Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात महिलेचे बंद घर फोडून ऐवज लांबविला

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील तापी नगरात महिलेचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिन्यांसह रोकड असा एकूण १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रेखा हरीश मदनानी (वय-४६, रा. तापी नगर, भुसावळ) या राहतात. ४ मे रोजी दुपारी एक वाजता घराला कुलूप लावून ते दवाखान्यात गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चार जण कारने आले. आपारमेंट मधील रेखा मदनानी यांच्या घरात घुसून घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा १ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. रेखा मदनानी या घरी आल्यानंतर त्यांच्या घरात सामान अस्तव्यस्त पडलेल्या दिसून आला. त्यांनी तातडीने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार महंमद वली करीत आहे.

Exit mobile version