Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात मजूराची दुचाकी लांबविली

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील आंबेडकर नगरातील बांधकाम करणाऱ्या मजूराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली असून बाजारपेठ पोलीसात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, अरूण किसन गायकवाड (वय-४२) रा. रमाई आंबेडकर नगर भुसावळ हे मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे मोटारसायकल (एमएच १९ बीसी ३३२६) आहे. कामासाठी या दुचाकीची वापर करतात. १८ जानेवारी वरोजी सायंकाळी ६.३० ते ७ वाजेच्यादरम्यान ते शहरातील कोंबडी बाजार येथे गेले होते. त्यावेळी पार्किंगला लावलेले दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार समोर आला होता. आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वाल्मिक सोनवणे करीत आहे.

Exit mobile version