Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्यास अटक

भुसावळ प्रतिनिधी । जामनेर रोडवरील एका घरातून भुसावळ शहर पोलीसांनी बेकायदेशीर दारू विक्री करतांना एकला अटक केली असून त्यांच्या ताब्यातील १ हजार ८७२ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संशयित आरोपी श्रावण रमेश देवरे (वय-३३) रा. रमाबाई आंबेडकर नगर हा त्यांच्या राहत्या घरात बेकायदेशीररित्या दारू विक्री करत असल्याची माहिती बाजार पेठ पोलीसांना मिळल्यानंतर आज दुपारी १२.१५ वाजता कारवाई करत १८० एमएल देशी दारू संत्रा असा एकुण १ हजार ८७२ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संशयित आरोपी श्रावण देवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे..

यांनी केली कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सपोनि अनिल मोरे, संदीप परदेशी, स.फौ. तस्लिम पठाण, पो.ना. रविंद्र बिऱ्हाड, रमण सुरळकर, उमकांत पाटील, तुषार पाटील, महेश चौधरी, पो.कॉ विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी कारवाई केली.

Exit mobile version