Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जळगाव रोडवरील एस.एफ.अमरेलीवसला पेट्रोल पंपावर १४ मार्च रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी दिलीप प्रभाकर चौधरी रा.लोणारी मंगल कार्यालय जवळ, भुसावळ हे एस.एफ. अमरेलीवसला पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून कामाला आहे. दैनंदिनीप्रमाणे 14 मार्च रोजी दिलीप चौधरी कामावर असतांना २५ ते ३० वयोगटातील अज्ञात सहा तरुणांनी पेट्रोल पंपाच्या ऑफिसचा दरवाजातोडून आत प्रवेश करून मॅनेजर यांना लाथा-बुक्यांनी मारहाण करून हातातील पैसे हिसकविण्याचा प्रयत्न केला. शहर पोलीस स्टेशनला गुरनं 50/2020 कलम 395, 511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार आहे.

Exit mobile version