Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात पत्ता अड्ड्यावर कारवाई ; १९ जणांवर गुन्हे दाखल !

 

 

भुसावळ  : प्रतिनिधी । शहरात  पत्ते खेळण्याच्या २ अड्ड्यांवर धाडी टाकून या २ गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी १९ आरोपींवर कारवाई केली आहे

 

पहिल्या गुन्ह्यात शहरात विवेकानंद नगर भागात योगेश  पाटील यांच्या  घराच्या समोरील मोकळ्या मैदानात लाइटच्या उजेडात  १४ मेरोजी रात्री  झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळताना १३ जण मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

 

फिर्यादी पोना रमण सुरळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून   सागर तायडे ( रा – गुलमोहर प्रेस्टिज ), उमेश  वाढे ( रा — पांडुरंगनाथनगर ) , तुषार डोळे ( रा–  न्यू हूडको कॉलनी ),  योगेश पाटील ( रा– विवेकानंदनगर ), शरद तराड (रा– ग्रीन पार्क) अमोल  खंडारे (रा — यशोदा हॉटेलजवळ ), किरण पाटील ( पांडुरंग नगर  ), नितीन  पाटील (पांडुरंग नगर ) , सागर काटकर (पांडुरंग नगर) ,   नितीन  महाजन (पांडुरंग नगर) , मुकेश  महाजन (पांडुरंग नगर ),  योगेश  भंगाळे (पांडुरंग नगर ) , उमेन्द्र  वाघचौरे (पांडुरंग टॉकीज जवळ )  या आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यांच्या ताब्यातून ३३ हजार ३३० रोख रक्कम , ८० हजार २०० रुपयांचे १३ मोबाईल असे एकूण १ लाख १३ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला  पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून गुुुरन १९६/२०२१ मुंबई जुगार ॲक्ट कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

 

ही कारवाई पो.हे.कॉ जयराम खोडपे , पो.ना रविंद्र बि-हाडे , कृष्णा देशमुख ,रमन सुरळकर , पो.कॉ.योगेश माळी, प्रशांत परदेशी, परेश बि-हाडे, विकास सातदिवे  यांनी  केली.

दुसऱ्या गुन्ह्यात शहरात साईनगर साईबाबा मंदिराच्या मागे जामनेर रोड येथे लाइटच्या उजेडात १५ मेरोजी पहाटेच्या वेळेस झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळताना ६ जण मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

 

फिर्यादी पोकॉ ईश्वर भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साईनगर साईबाबा मंदिराच्या मागे जामनेर रोड येथे लाइटच्या उजेडात १५ मेरोजी पहाटेच्या

सुमारास सार्वजनिक जागी  पत्ते खेळताना देवचंद गोसावी (वय 26,  रा – महेश नगर) , अमोल राणे ( वय 23 रा — श्रीराम नगर) गजानन पाटील (वय 29 , रा– महेश नगर) प्रशांत सुरवाडे ( वय 23, रा — कलानगर), निखिल  पाटील (वय 25,  रा– पेरणा नगर) , श्रीकृष्ण सकाळ (वय 37 , रा– दीनदयाल नगर )  याच्याकडून १५ हजार ५६० रोख रक्कम मिळून आली स्वतःच्या फायद्यासाठी झन्ना मन्ना नावाचा पत्त्याचा खेळ खेळताना मिळून आले  पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून गुुुरन १९६/२०२१ मुंबई जुगार ॲक्ट कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही  कारवाई पोहेकॉ सुनील जोशी, पोना उमाकांत पाटील, दिपक पाटील, होमगार्ड लीलाधर कपले  यांनी   केली

Exit mobile version