Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात दोन गावठी पिस्तूलासह तरूणास अटक

जळगाव प्रतिनिधी । अवैधरित्या दोन गावठी पिस्तूल घेवून फिरणाऱ्या तरूणाना आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले असून त्यांच्या ताब्यातील दोन्ही गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना गुप्त माहिती मिळाली की भुसावळात गावात जाणारा रोडवर अलफरान माशिद कॉप्लेक्स परीसरात संशयित आरोपी संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी पोहेकॉ महेश महाजन, शेख युनुस शेख रसुल, शरिफोद्दिन यांनी कारवाई करत संशयित आरोपी सैय्यद कलीम सैय्यद जावीद (वय-२१) रा. मुस्लिम कॉलनी, खडका रोड, भुसावळ याला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील ४० हजार रूपये किंमतीचे दोन गावठी पिस्तेल हस्तगत करण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version