Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात दारूची अवैध विक्री करणारा अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । येथील मॉडर्न रोडवर दारूची अवैध विक्री करणार्‍याला बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने रात्री अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, काल रात्री साडेआठच्या सुमारास शहरातल्या मॉर्डन रोडवरील अग्रेसन भवनाच्या आडोश्याला सार्व.जागी एक इसम त्याच्या कबज्यात गैर कायदा विना परवाना देशी व विदेशी दारुची विक्री करत असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने बाजारपेठ पोलिसांनी त्याला अटक केली. या पथकात स.पो.नि.अनिल मोरे पो.ना रविंद्र बिर्‍हाडे,रमन सुरळकर,महेश चौधरी पो.कॉ.कृष्णा देशमुख,विकास सातदिवे,तुषार पाटील ,ईश्‍वर भालेराव ,प्रशांत परदेशी यांचा समावेश होता. संबंधीत गणेश कडुबा बाविस्कर (वय – ३२ रा.दिनदयाल नगर नाहाटा कॉलेज जवळ भुसावळ ) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे टँगो आणि टुबोर्ग कंपनीच्या बाटल्यांचा एकूण ४४२४ रूपयांचा ऐवज मिळून आला आहे. त्यावर भु.बा.पेठ.पो.स्टे ला प्रोव्हीशन गु.र.न.८२/२०२० महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम १९४९ क. ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पो.ना यासिन पिंजारी करीत आहेत.

Exit mobile version