Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात तरूणावर प्राणघातक हल्ला

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील कुटे गल्ली परिसरातील तरूणावर आज रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला असून त्याला जळगावच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कुटे गल्लीतील रहिवासी सौरव यशवंत कुटे याच्यावर रात्री काही जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून ही घटना भारत नगर परिसरात घडली. यानंतर तातडीने सौरव कुटे याला जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला नेमका कुणी केला व यातील आरोपी कोण याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत याबाबत शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version