Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात जुगाराचा डाव उधळला; सहा जणांवर कारवाई

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील वाल्मीक नगर भागात सुरू असणार्‍या जुगारावर बाजारपेठ पोलिसांनी धाड टाकून सहा जणांना अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना वाल्मिक नगर भागात गब्बर चावरीया यांचे घराचे पाठी मागील असलेल्या मोकळ्या जागेत काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. यानुसार त्यांनी निर्देश दिल्याने बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी या ठिकाणी छापा टाकला असता विकास वसंत वलकर (वय-३२); अजय दिपचंद बोयत (वय-३८); करण गोपाल ढोलपुरे (वय-२५); हेमंत रमेश ढिक्याव (वय-३० ); राहुल अशोक टाक (वय- ३०) आणि आकाश रायसिंग पंडित (वय-२४ सर्व रा.वाल्मिक नगर भुसावळ ) हे जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्याकडे पत्ता जुगाराची साधने व रोख रक्कम ११३९० /- रुपये सह मिळुन आल्याने वरील सहा जणांवर विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-१२(अ) प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाहीउपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो. निरीक्षक संदीप परदेशी पो.ना. रमण सुरळकर, पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी व होमगार्ड कर्मचारी आकाश सुरळकर यांच्या पथकाने केली आहे.

Exit mobile version