Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह एकाला अटक

भुसावळ प्रतिनिधी । गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह फिरणार्‍या एका तरूणाला बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, काल रात्री २३:३० वा.सुमारास वांजोळा रोडवरील स्टार लान्स जवळ सार्वजनीक ठिकाणी एक इसम हा त्याच्या कबज्यात गैरकायदा गावठी कट्टा ताब्यात बागळुन फिरत असल्याची गुप्त माहीती स.पो.नि संदिप परदेशी यांना मिळाली होती. यानुसार बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने चंद्रकांत विनोद घेंघट ( वय – १९ रा.वाल्मीक नगर भुसावळ ) याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेला गावठी कट्टा व एक जीवंत काडतुस मिळाले. यामुळे त्याच्या विरूध्द बाजारपेठ पोलीस स्थानकामध्ये भाग ६ गु.र.न ६८८/२०२० आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे कॉ सुनिल जोशी असे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर अधिक्षक भाग्यश्री नवटके, उप.पो.अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ स्थानकाचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप परदेशी, पो.ना रविंद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, नेव्हील बाटली, तुषार पाटील, उमाकांत पाटील, पो.कॉ बंटी कापडणे, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी,ईश्‍वर भालेराव,चेतन ढाकणे यांच्या पथकाने केली.

Exit mobile version