Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळातील सिंधी कॉलनीतल्या जुगार अड्डयावर धाड

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने धाड टाकून १० जणांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, सिंधी कॉलनी भागातील शिव मंदिराजवळच्या एका घरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांच्य मार्गदर्शनाखाली स.पो.नि संदिप परदे सर स.पो.नि.अनिल मोरे, पो.ना रविंद्र बिर्‍हाडे,रमण सुरळकर, महेश चौधरी,उमाकांत पाटील,तुषार पाटील, पो.कॉ.कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी व बंटी कापडणे यांच्या पथकाने रात्री साडे आठच्या सुमारास येथे धाड टाकली. याप्रसंगी बलराम ऊर्फ (बंटी) आनंदराम रोयडा वय-३३, प्रकाश राजकुमार चांदवाणी वय-३१; सुमीत महेश कुमार वालेचा वय-२५; दिपक विष्णुदास आहुजा वय-४० ; आकाश श्रीचंद कामनानी वय-२५; बाबु रमेश आहुजा वय-३१ ;राकेश शामलाल आगीचा वय-३६ ;अजय अरुन कुमार मेघराज वय-२९ ; प्रवीण घनश्यामदास कुकरेजा वय-३० आणि लक्ष्मण कन्हैयालाल शर्मा वय-४७ हे सर्वजण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्याकडे सुमारे साडे अठरा हजारांची रोकड देखील आढळून आली.

यावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून बाजारपेठ पोलीस स्थानकामध्ये ६ गु.र.न ५६० /२०२० मु.जु.अँक्ट क.१२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि संदिप परदेशी करीत आहेत.

Exit mobile version