Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळातील शिवाजी नगरातून दुचाकी लंपास

भुसावळ प्रतिनिधी । येथील शिवाजी नगर मधील पोस्ट ऑफिस जवळून अज्ञात चोरटयाने दुचाकी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगर मधील पोस्ट ऑफिस जवळील रहिवासी राजेश रमेश शिंदे यांची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स दुचाकी (क्र.एमएच.१९, सिटी ६१९४) ही अज्ञात चोरटयाने चोरुन नेली. याबाबत ऑनलाइन तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर राजेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ चौधरी हे करीत आहे.

तक्रार घेण्यास टाळाटाळ
मोटरसायकल चोरीप्रकरणी सुरुवातीला तक्रार घेण्यात आली नाही. ऑनलाइन तक्रार करा असे सांगण्यात आले. त्यानंतर चोरीची तक्रार देण्यात आली. मात्र अद्यापपावेतो घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला नाही व तपास ही होत नाही असे सांगण्यात आले आहे. या दुचाकी चोरी प्रकरणी पोलीसांनी तेथील सीसीटीव्ही तपासून तपास करावा असे सांगण्यात आले.

Exit mobile version