Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळातील मयत कोरोना रूग्णाच्या घरातून लाखोंची रोकड लंपास; पोलिसांसमोर आव्हान

भुसावळ प्रतिनिधी । शहरात दुसऱ्यांदा कोरोना पाँझिटिव्ह रूग्णाच्या घरी धाडसी चोरी झाल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तर नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शहरातील पोपट मंगा बोंडे यांच्या घरातुन लोखो रुपयांची रोकड व दागिने चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास लंपास केल्याची घटना घडली आहे.

भुसावळ शहरातील प्रसिद्ध बोंडे मटण हाँटेलचे संचालक पोपट मंगा बोंडे यांचे कोरोना संसर्गामुळे दोन दिवसा पुर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या परीवाराला क्वांरटाईन केल्याने घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास लोखोंची रोकड व दागदागिने लंपास केल्याची घटना शहरातील सपना नगर भागात घडली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असुन नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे .

घटना समजताच पोलिसांनी डाँग स्काटसह घटनास्थळी धाव घेतली.
यापूर्वी देखील खडका रोडवरील कोरोना पॉझिटीव्ह डॉक्टरांच्या घरातून १५ लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती . शहरात मागच्या आठ दिवसापुर्वी तीन गावठी पिस्टल व तलवार पोलिसांनी हस्तगत केली आहे. कोरोनाच्या पाश्वभुमिवर पोलीस बिझी असल्याची संधी साधत चोरटे बंद घरांना टारगेट करीत आहे. शहरात दुसऱ्यांदा धाडसी चोरी झाल्याने पोलीसां समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे नेमकी किती रोकड व दागिने लंपास केले ते समजु शकले नाही.

Exit mobile version